Monday, 2 May 2016

पाण्याचा प्रश्न पाण्याची किंमत मोजायला लागली की सुटेल.


जगात पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यशस्वी ठरलेल्या मार्गाची सूत्रे अशी: 

जगभर अनेक देशात ही सूत्रे वापरली जातात.

१. पाण्याचा प्रश्न हा अर्थशास्त्रातील मर्यादित साधनांच्या वाटपाचा आहे.
२. पाणी हे एक मर्यादित प्रमाणात उपलब्ध असलेले एक साधन आहे हे मान्य करावे लागते.  कोणत्याही मर्यादित  प्रमाणात उपलब्ध असलेल्या इतर वस्तूप्रमाणे पाण्यालाही अर्थशास्त्राचे नियम लागू होतात.
३. पाण्याची वापरासाठीची योग्यता आणि उपलब्धता त्याची किंमत ठरवतात. वापरातील अग्रक्रम त्यावरच अवलंबून असतो.
४. ह्या साधनासाठी अनेक प्रकाराच्या उपयोगाची स्पर्धा असेल तर त्यासाठी द्यावी लागणारी  किंमत हेच एकमेव वाटपाचे प्राधान्यक्रम ठरवणारे एकक असू शकते.
५. पाण्याची किंमत-  पाणी जमा करणे, साठवणे, पुरवणे यांचा खर्च भरून निघावे - इतकी तरी असणारच आहे.
ती किंमत झाल्याशिवाय वरील कामाचा परतावा होणार नाही, त्याशिवाय या क्षेत्रात गुंतवणूक होणार नाही.
पाणी मोफत किंवा नाममात्र किमतीला मिळाले की त्याची साठवणूक, शुद्धीकरण, पुरवठा, यांच्या खर्चाची कल्पना उपयोग करणाऱ्याला येत नाही. महागामोलाच्या साधनांची नासाडी होते.
६. किंमतीतील फरक आणि  नफा मिळण्याची आशा  उद्योजकाला  पाण्याचा व्यापार, पुरवठा,  साठवणूक, पुनर्वापर, शुद्धीकरण इत्यादी साठी प्रेरित करतात. त्यातून हजारो लोकांना रोजगार मिळतो. लोकांना सेवा मिळतात.
७. या वस्तुस्थितिकडे दुर्लक्ष केल्यास पाण्याचा अभाव आणि तुटवड्याचे प्रश्न गंभीर होतात.
८. पाण्याचा प्रश्न  पाण्याची किंमत मोजायला लागली की सुटेल.
९. त्यासाठी आवश्यक ती कायद्याची, अधिकाराची, संस्थात्मक चौकट उभी करणे आणि अंमलात आणणे आवश्यक आहे. यांचा आग्रह धरणारी मंडळी समोर आली पाहिजे. त्याची एक चळवळ व्हावी. अशी नीती ठरवण्यासाठी जनमत तयार व्हावे.
१०. आज आपल्याकडे चर्चेत असलेले जल संस्कृती, परंपरा, जनसेवा,  उपदेश,  नीतीनियम, न्याय्य वाटपाचे लढे हे मार्ग त्यासाठी उपयोगाचे नाहीत. 

No comments:

Post a Comment