
मित्रांनो,
स.न. वि. वि.,
बरेच दिवस विचार केल्यानंतर पुन्हा एकदा शेतकरी आणि शेतीच्या स्वातंत्र्याच्या मूळ प्रश्नावरच उभे राहिले पाहिजे या निष्कर्षावर मी आलो आहे. त्यासाठी सम्प्रेशानाचे साधन म्हणून ह्या माध्यमाचा- जाल-नोंदींचा उपयोग महत्त्वाचा ठरेल अशी आशा आहे. या कार्यात समविचारी सहकाऱ्यांचा सहभाग मिळावा यासाठी हा प्रयत्न. आपण आवर्जून इकडे लक्ष द्यावे आणि सहभागी व्हावे ही विनंती.
आपला
मानवेंद्र सावळाराम काचोळे
औरंगाबाद